रुद्रगर्जना वाद्यपथकात आपले स्वागत आहे Welcome to Rudragarjana

Rudragarjana Vadyapathak is one of Pune’s leading traditional Dhol-Tasha troupes, now proudly expanding internationally with a new branch in Chicago, USA.
Founded in 2013, our mission is to create a platform by Vadaks, for Vadaks, to celebrate and preserve this vibrant musical tradition.
Registered as a charitable trust, Rudragarjana has over 300 active members and a collection of more than 200 instruments. We are honored to participate in prestigious processions, including those of Kasba Ganapati and the Hutatma Babugenu Ganapati Mandal Trust.

रुद्रगर्जना वाद्यपथक हे पुण्यातील अग्रगण्य पथकांपैकी एक असून यंदा पथकाचे हे १३ वे वर्ष आहे. गेल्या १२ वर्षात पथकाने उत्तुंग अशी भरारी घेतली आहे. पुण्यनगरीचे ग्रामदैवत, मनाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीतील वादन, नवसाचा गणपती हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्ट च्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीतील वादन हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
त्याचबरोबर करवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या नागरप्रदक्षिणेत वादन करणारे पहिले पथक असल्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. कन्नोज - मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, गोवा इत्यादी राज्यातील मानाच्या मिरवणुकीचा मान पथकास मिळला आहे. स्थापनेपासून दरवर्षी रुद्रगर्जना वाद्यपथक हे पहिले वादन युद्धात जायबंदी झालेल्या जवानांसाठी मानवंदना म्हणून करीत आले आहे. गणेशोत्सवातील वादनासोबतच IPL २०१६ चा उदघाटन सोहळा, NBA इंडिया चा उदघाटन सोहळा, चॅम्पिअन्स ट्रॉफी २०२५ साठीच्या कोका कोला जाहिरातीतील वादन, Godlike India यांच्या मिरवणुकीतील वादन हे इतर उल्लेखनीय वादन.
रुद्रगर्जना वाद्यपथकाची पुण्यासोबतच अमेरिकेतील शिकागो येथे शाखा असून आंतरराष्ट्रीय स्थरावर पथकाचा विस्तार केला आहे.

रुद्रगर्जना वाद्यपथक हे धर्मादाय आयुक्तालय येथे नोंदणीकृत पथक असून सामाजिक कार्यातसुद्धा सहभागी होत आले आहे. वादन संस्कृती जपण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी देखील आम्ही कटिबद्ध आहोत.

१३ वर्षे अभिमानाची

उल्लेखनीय

अभिमानास्पद

नोंदणी अर्ज

टीप: सदर नोंदणी हि प्राथमिक माहितीसाठी असून आपली नोंदणी पूर्ण झाली आहे असे नाही, सदर फॉर्म भरून नोंदणी केली असली तरी सराव सुरु झाल्यानंतर पथकाच्या सरावास उपस्थिती लावून पथकाच्या नियमानुसार आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: सुमित जाधव : 8669031361

सदर फोन नंबर हा आपणांस पुढिल माहिती देणे करिता वापरणार असून चुकीचा नंबर अथवा whatsapp नसलेला नंबर दिल्यामुळे पुढील माहिती न मिळाल्यास आम्ही जबाबदार नाही.
तुम्ही वयाचे १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहिती अथवा शंका असल्यास आम्हास संपर्क साधावा.

नोंदणी अर्ज भारण्याआधी खाली दिलेले नियम आणि अटी वाचूनच नोंदणी पूर्ण करणे.

सदर फॉर्म भरून आम्ही रुद्रगर्जना वाद्यपथकास संपर्क करण्याची अनुमती देत आहोत.

  • वयाची अट : १८ वर्षे पूर्ण.
  • अनुभवाची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल.
  • सदर फॉर्म हा प्राथमिक माहिती करिता आहे. .
  • आम्ही आपली माहिती कोणत्याही परिस्थितीत कोणाशी हस्तांतरित करीत नाही.
  • आपली वैयक्तिक माहिती आमच्याकडे पूर्णपणे सुरक्षितरित्याच ठेवली जाते.
  • अर्धवट अथवा चुकीची माहिती ग्राह्य धरली जाणार नाही.
सरावाचे ठिकाण

शिंदे मैदान, क्रॉसबार मल्टि स्पोर्ट्स अरेणा, फन टाईम थेटरच्या मागे, सिंहगड रोड, पुणे

संपर्क:

सुमित : 8669031361

सरावाची वेळ :

दररोज सायंकाळी ६:०० ते ९:००

सहभागी व्हा

नियम आणि अटी Welcome to Rudragarjana

  • सदर नोंदणी अर्ज भरल्यानंतर आपली प्राथमिक नोंदणी झाली असून हि अंतिम नोंदणी नाही.
  • आपणास सराव सुरु झाल्यानंतर सरावाच्या ठिकाणी येऊन आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे.
  • नोंदणी अर्ज भरल्यानंतर आपणास whatsapp द्वारे पुढील सूचना वेळोवेळी देण्यात येतील.
  • पथकाचा सराव शुभारंभ लवकरच होणार असून त्यासंबंधित सर्व माहिती देण्यात येईल, सराव शुभारंभापासून आपली अंतिम नोंदणी करण्यात येईल.
  • पथकातील जागा मर्यादित असल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • सर्व जागा भरल्यानंतर कोणत्याही सबबीवर नोंदणी केली जाणार नाही.
  • पथकाद्वारे देण्यात येणाऱ्या सर्व सूचना तसेच नियम यांचे काटेकोर पालन बंधनकारक आहे.
  • सराव आणि सरावाची वेळ हे सर्वांना बंधनकारक आहे.
  • नोकरी अथवा इतर काही अडचणींमुळे पथकाच्या सरावाच्या वेळे संबंधित काही अडचण असल्यास आम्हास संपर्क साधावा.
  • कोणत्याही वेळी नोंदणी रद्द पथक करू शकत आणि त्यासाठी कोणासही कोणतेही उत्तर देण्यास पथक बांधिल राहणार नाही.
नियम आणि अटी
आपला नोंदणी अर्ज मिळाला आहे.
आपणांस आम्ही लवकरच whatsapp वर संपर्क करू.

रुद्रगर्जना वाद्यपथक परिवारात आपले स्वागत आहे.

आपणांस कोणतीही शंका अथवा मदत हवी असल्यास आम्हास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. सुमित जाधव : 8669031361.
टीप: आपणांस सरावाच्या ठिकाणी प्रत्यक्ष नोंदणी करणे अनिवार्य आहे.

आम्ही आपणास रुद्रगर्जना वाद्यपथकातील सदस्य म्हणून पाहण्यास उत्सुक आहोत. भेटूया लवकरच.
गणपती बाप्पा मोरया..!!

बंद करा